सुरक्षेविषयीच्या प्रश्र्नांचा समावेश करून संरक्षणाचा
आणखी एक स्तर निर्माण करा

सुरक्षेविषयीचे प्रश्र्न कोणते असतात?
सुरक्षेविषयीचे प्रश्र्न हे सुरक्षेविषयीचे घटक असतात ज्यांच्यामुळे संरक्षणाचा अतिरिक्त स्तर मिळतो. तुम्ही तुमच्या पसंतीनुसार कोणत्याही तीन प्रश्र्नांची उत्तरे देऊ शकता. तुम्ही आता जी उत्तरे द्याल ती रेकॉर्ड केली जातील व संपूर्णपणे गोपनीय , सुरक्षित आणि संरक्षित ठेवली जातील. तुमचे संरक्षण करण्यासाठी आमचे सेक्युरिटी इंजिन बॅकग्राऊंडमध्ये कार्यरत असेल आणि जर तुमच्या नेहमीच्या ऑनलाइन बँकिंग वापराबद्दलच्या व्यवहारांमध्ये त्याला काही बदल दिसून आला तर (आणि तरच) ते तुम्हाला एक प्रश्र्न विचारेल. असा प्रश्र्न विचारला गेला तर तुम्हाला त्या प्रश्र्नाचे नेमके तेच उत्तर द्यावे लागेल जे तुम्ही आता देणार आहात.
कृपया लक्षात घ्या की तुमच्या उत्तरांचा उपयोग जेव्हा आमच्या सेक्युरिटी इंजिनला तुमच्या नेहमीच्या व्यवहारांपेक्षा वेगळे व्यवहार आढळतील तेव्हा फक्त तुमची ओळख निश्र्चित करण्यासाठी केला जाईल..
हे सुरक्षाविषयक प्रश्र्न (सेक्युरिटी क्वेश्चन्स) तयार करताना मी काय लक्षात ठेवले पाहिजे?
हे तीन प्रश्र्न असतात, जे तुम्ही तुमच्या वैयक्तिक उत्तरांसह निर्माण करता आणि ते आम्हाला तुमची ओळख निश्र्चित करण्यासाठी मदत करतात. हे प्रश्र्न तयार करताना तुम्ही पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत:
- ते तुमच्या वैयक्तिक बाबतीत असले पाहिजेत
- तुम्हाला त्यांची उत्तरे लक्षात ठेवणे सोपे असले पाहिजे परंतु इतर कोणालाही त्याबाबत अंदाज बांधणे कठीण गेले पाहिजे
- ते तुमच्या सोशल मीडियावरील ‘पब्लिक’ प्रोफाइलमधले असता कामा नयेत
- ते कोणालाही सांगता कामा नयेत
एक गोष्ट लक्षात घ्या की कोणताही अधिकृत बँक कर्मचारी हे प्रश्र्न कधीही विचारणार नाही.
मला हे प्रश्र्न कधी विचारले जातील?
तुम्हाला वाढीव सुरक्षा देण्यासाठी आमचे सेक्युरिटी इंजिन नेहमीच बॅकग्राऊंडमध्ये कार्यरत असेल. जर तुमच्या नेहमीच्या ऑनलाइन बँकिंग व्यवहारांच्या तुलनेत वेगळ्या प्रकारचे व्यवहार आमच्या प्रणालीला दिसून आले तर (आणि तरच) ती तुम्हाला एक प्रश्र्न विचारेल.
जेव्हा तुम्ही काही विशिष्ट व्यवहार पूर्ण करीत असाल किंवा ऑनलाइन बँकिंगमध्ये लॉगिन करत असाल तेव्हा तुम्हाला हे प्रश्र्न विचारले जातील. हे प्रश्र्न ऑनलाइन बँकिंगमधील तुमची ओळख निश्र्चित करण्यासाठी विचारले जातील.
यामुळे सुरक्षेत सुधारणा कशा रीतीने होईल?
सुरक्षाविषयक प्रश्र्न (सेक्युरिटी क्वेश्चन्स) हे सुरक्षेबद्दलचे घटक असतात ज्यांच्यामुळे संरक्षणाचा अतिरिक्त स्तर मिळतो. हे प्रश्र्न व उत्तरे तुमच्यापुरतीच वैयक्तिक स्वरूपाची असतात आणि त्यामुळे आम्हाला तुमची ओळख निश्र्चित करण्यास मदत होते. सुरक्षाविषयक प्रश्र्नांबरोबरच इंडसइंड इंटरनेट बँकिंग अधिक सुरक्षित करणारी अनेक सुरक्षाविषयक वैशिष्ट्ये आहेत, ज्यांत फ्रॉड (अफरातफरीचे कृत्य) शोधून काढणारी प्रणाली, सांकेतिकीकरण (एनक्रिप्शन), फायरवॉल्स आणि ऑटोमॅटिक टाइमआऊटस यांचा समावेश आहे.
उदाहरणे
येथे दिलेली उत्तरे केवळ निर्देशात्मक आहेत. कृपया हीच उत्तरे वापरू नका.
तुमचे व्हेकेशन होम कोणत्या शहरात आहे?
नैनिताल (तुमच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून या प्रश्र्नाचे उत्तर माहीत होता कामा नये)तुमच्याकडील पहिल्या पाळीव प्राण्याचे नाव काय?
रूस्टर (हे उत्तर तुमच्यापुरते खाजगी असले पाहिजे)तुम्ही सर्वात प्रथम जेथे काम केलेत त्या कंपनीचे नाव काय?
एबीसी लिमिटेड (या उत्तराला परवानगी नाही कारण हे उत्तर सोशल मीडियावरून सहजपणे शोधून काढता येईल)तुमचे टोपण नाव काय आहे?
एएए किंवा पीक्यूआर (या उत्तराला परवानगी नाही कारण एकच अक्षर पुन्हापुन्हा टाइप करण्याला परवानगी नाही)